आदरणीय डॉ पाटील सर,
स. नमस्कार..
मी श्रीमती चंद्रकला गुजर, रा. बुलढाणा येथून आलेली आहे. २४-१२-२२ ला इलाज करण्यासाठी येथे आले. मला औरंगाबाद वरून डॉक्टरने परत पाठवले होते, माझी काहीच गॅरंटी नव्हती. मला तेथे या हॉस्पिटल विषयी समजले, घरच्यांनी लगेच मला येथे आणले.
आज २८-१२-२०२२ रोजी मी बरी होऊन घरी जात आहे.
पाटील सर खरंच आपल्या महाराष्ट्रात आपल्या सारख्या डॉक्टरची गरज आहे. आपला संपूर्ण स्टाफ सगळ्यांना घरचांसारखी वागणूक देतो. मगर सर व योगेश दादा ने आमची खूप काळजी घेतली. येथील वातावरण खूप छान
आहे. सर्व स्टाफ काळजी घेणारा आहे. खरंच कोणीही आजारी व्यक्ती रडत इकडे येतो.., पण हसत घरी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
धन्यवाद पाटील सर !
मो. न- 9763014148